जमिनीची मोजणी करा घरबसल्या ऑनलाईन आपल्या मोबाईल वरून

जमिनीची मोजणी करा घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरून


मित्रांनो आपण आपल्या शेत जमिनीची मोजणी हे घरबसल्या एकदम अचूकपणे आपल्या मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने फक्त पाच ते सहा मिनिटांमध्ये करू शकतो. 

आपल्याला आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत तरीसुद्धा आपण मोबाईलच्या साह्याने आपल्या जमिनीची अचूक मोजणी करू शकतो. यामुळे तुमचा वेळ व पैसा दोन्हीही वाचणार आहे. 

या पोस्टमध्ये आपल्या शेत जमिनीची मोजणी मोबाईल वरून घरबसल्या कशी करायची याविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत. 

पूर्वीच्या काळी आपल्याला जर जमीन मोजायची असेल तर ती पारंपारिक पद्धतीने मोजावी लागत होती. किंवा शासकीय पद्धतीने जमीन मोजण्यासाठी शासनाला अर्ज करून शासकीय पद्धतीने जमीनीची मोजणी करत होते. परंतु आता आपल्याकडे डिजिटल पद्धतीने जमीन मोजण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण आपल्या मोबाईल वरून आपली सर्व शेतजमीन मोजू शकतो. 

या डिजिटल पद्धतीने जमीन मोजण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे लागण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने आपण अगदी एकदम सोप्या पद्धतीने आपल्या जमिनीचे मोजमाप करू शकतो. ऑनलाइन पद्धतीने जमिनीची मोजणी करण्यासाठी आपण घरबसल्या आपल्या जमिनीवर क्लिक Click करून म्हणजेच आपल्या जमिनीच्या बांधावर क्लिक करून जमिनीचे पूर्ण क्षेत्रफळ मोजू शकतो किंवा आपण आपल्या जमिनीच्या सर्व बांधावर फिरवून आपले जेवढे शेत्रफळ आहे तेथे काठाने फिरून आपली जमीन मोजू शकतो. 

● आपल्या मोबाईलच्या साह्याने आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर ( Play Store) वरून एक App डाऊनलोड करावे लागते. त्या मोबाईल ॲप्लिकेशन च्या सहाय्याने आपण आपल्या शेत जमिनीची मोजणी अचूकपणे करू शकतो. हे Application वापरण्यास अगदी सोपे आहे. त्यामुळे कोणीही सहजपणे स्वतःच्या जमिनीची मोजणी ऑनलाईन करू शकतो.


आपल्या जमिनीची मोजणी ही ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वप्रथम आपल्या जवळ असणाऱ्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर ( Play Store) हे App ओपन करून त्यामध्ये तुम्हाला जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे मोबाईल App सर्च करून डाऊनलोड करायचे आहे. हे App तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे,

2. आता हे App ॲप ओपन Open करा त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिलेले असतील त्यामध्ये तुम्ही पहिल्या पद्धतीमध्ये हाताने तुमच्या जमिनीची हद्द सिलेक्ट करून मोजणी करू शकतात. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या शेताच्या हद्दीवरून / बांधावरून चालत जाऊन मोजणी करू शकतात.

3. आपल्या जमिनीची अचूकपणे मोजमाप होण्यासाठी आपण वॉकिंग म्हणजे शेताच्या बांधावरून चालत जाऊन मोजमाप करण्याची प्रक्रिया निवडून घेऊया.

4. आता तुम्हाला तुमच्या शेतातील बांधावरून चालत जायचे आहे. जेवढी तुमची जमीन आहे, त्या शेत जमिनीच्या हद्दीवरून /बांधावरून तुम्हाला तुमच्या  शेताला पूर्ण वेढा घालायचा आहे.


5. आता तुम्हाला तुमच्या मोबाइल च्या स्क्रीन वर तीन टिंब दिसतील त्यावर Click क्लिक करा आणि तुमच्या जमिनीची मोजणी ही हेक्टर मध्ये, एकर मध्ये,  किंवा गुंठेवारी मध्ये करायची हे सिलेक्ट करून घ्या.  तुम्हाला ज्या पद्धतीने तुमची जमीन मोजायची असेल त्या  पर्यायावर क्लिक करा.

6. आता तुमच्या समोर तुमच्या जमिनीचे असलेले एकूण क्षेत्रफळ आलेले असेल. अशा पद्धतीने आपण पहिल्या वॉकिंग म्हणजेच बांधावरून चालत जाऊन या पर्यायाच्या साह्याने आपली जमीन मोजू शकतो.


घरबसल्या ऑनलाईन जमीन कशी मोजायची

आपल्याला आपली जमीन घरबसल्याच ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलच्या साह्याने मोजायची असल्यास तुम्हाला जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे App डाऊनलोड करून घेऊन ते तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. 

आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पहिला पर्याय असणाऱ्या म्हणजेच Manually option निवडून मॅप MAP च्या पर्यावर क्लिक Click करायचे आहे. आता तुम्हाला मॅप MAP च्या साह्याने तुमची जमीन शोधून त्या जमिनीवर जायचे आहे. 

तुमचा मॅप त्या जमिनीवर गेल्यास तुम्हाला तुमच्या शेताच्या संपूर्ण जेवढे बांध असतील त्यावर क्लिक करत करत सिलेक्ट करून घ्या. म्हणजे तुम्हाला मोबाईलवर तुमच्या हाताने तुमच्या जमिनीच्या संपूर्ण हद्दीवर क्लिक करत करत संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफळ सिलेक्ट Select करायचे आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर जमीन ही  एकर मध्ये मोजायची किंवा हेक्टर मध्ये मोजायची किंवा गुंठेवारी मध्ये मोजायची यापैकी एक पर्याय निवडून घ्या. 

त्यानंतर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ मोजमाप करून दिलेले असेल.

अशाप्रकारे आपण आपल्या जमिनीची मोजणी  घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मोबाईलच्या साह्याने करू शकतो. 


ही माहिती इतरांना देखील शेअर करा आणि अशाच पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.