SBI Mutual Fund :- तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आता SBI ची ही खास SIP योजना फक्त तुमच्यासाठी, दरमहा २ हजाराच्या बचतीवर आता तुम्हाला मिळतील ३० लाख रुपये
गेल्या काही वर्षांपासून लोकांमध्ये पैशाच्या गुंतवणुकीची हालचाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड व क्रिप्टोकरन्सी सारख्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास आता लोक मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहेत. कोणत्याही अर्थव्यवस्थेत चढ-उतार येतच असतात त्याच वेळी, ते नेहमीच दीर्घकालीन वाढते आणि याला समांतर गुंतवणुकीची बाजारपेठ विकसित होते. अशा प्रकारच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये, त्यांनी नेहमीच दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करायला हवी, जर तुमच्या घरात तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म नुकताच झाला असेल आणि तुम्ही त्याच्या उच्च शिक्षणासाठी गुंतवणुकीचा एखादा चांगला पर्याय शोधत असाल तर या लेखात आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या SBI एका खास म्युच्युअल फंड योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत.
SBI Technology Opportunities Fund Direct Growth
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या या म्युच्युअल फंड योजनेचे नाव एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्यूनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ ( SBI Technology Opportunities Fund Direct Growth ) असे आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांचे उच्च शिक्षण आणि त्यांचे भविष्य सुरक्षित व सुनिश्चित करण्यासाठी २ हजार रुपये गुंतवून ३० लाखांचा फंड जमा करायचा असल्यास तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया च्या या योजनेत एसआयपी SIP करावी लागेल. एसआयपी SIP केल्यानंतर तुम्हाला या म्युच्युअल फंड योजनेत प्रति महिन्याला २ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय आपण केलेल्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे १५ % टक्के परतावा मिळेल, अशी अपेक्षा करता येईल.
बाजाराची वर्तणूक आपल्यासाठी अनुकूल असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही २० वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी ३०.३ लाख रुपयांचा फंड सहजपणे जमा करू शकता. या जमा केलेल्या पैशांचा वापर तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी व त्यांच्या उच्च शिक्षणासाठी करू शकाता. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या तीन वर्षांत २६.३३% टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
महत्वाची सूचना : शेअर बाजारातील गुंतवणूक आणि म्युच्युअल फंड ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या झालेल्या आर्थिक नुकसानीस kdmarathi.in हे संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.