दूध प्यायच्या पूर्वी किंवा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले की वाईट ?
दूध व पाणी हे दोन्ही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत. पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते व त्यामुळे शरीरातील अनेक कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. तसेच दुध हे अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण बनलेले असते. यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, सेलेनियम, कोलीन यांसारखी आवश्यक खनिजे व जीवनसत्त्वे ए, बी, डी, रिबोफ्लेविन अतिशय चांगल्या प्रमाणात आढळतात, जे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. बरेचवेळा आपण पाहतो की अनेकजण दूध प्यायल्यानंतर पाणी पितात किंवा दूध पिण्यापूर्वी पाणी पितात. पण अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न येतो की करणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का ? असे करणे बरोबर आहे का ? असे आपण दूध पिण्यापूर्वी किंवा नंतर लगेच पाणी पिणे हे योग्य आहे का ? असे केल्याने याचे आपल्या आरोग्यावर किंवा शरीरावर काही दुष्परिणाम होतात का? तर चला आपण जाणून घेऊया.
दुधामधील प्रथिने स्नायूंच्या वाढीस, देखभाल आणि दुरुस्ती करण्यास मदत करतात. हे विशेषतः फिजीकल ऍक्टीव्हीटीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जसे की क्रीडापटू व नियमित व्यायामात गुंतलेल्या व्यक्तींना यांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं.
दूध पिण्यागोदर किंवा नंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य ?
दूध पिण्याअगोदर किंवा नंतर त्यावर लगेच पाणी पिण्याने आपल्या आरोग्यावर त्याचा खूप मोठा हानिकारक परिणाम होईल, अगदी असेच नाही. परंतु अशी सवय आपल्या आरोग्याला काही प्रमाणात नुकसान पोहोचवू शकते. दूध आणि पाणी हे दोन्ही पदार्थ ( द्रव ) आहेत. दूध पिण्याअगोदर किंवा नंतर लगेच त्यावर पाणी प्यायल्यास, दुधातील पोषकमूल्यांचा आपल्या शरीराला पूर्णपणे फायदा होत नाही. सर्वसाधारणपणे सगळेचजण दूध पितात कारण ते पौष्टिकतेने परिपूर्ण आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दूध पिण्याअगोदर किंवा नंतर त्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचन आणि दुधातील पोषक तत्वांचे शोषण करून घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
आपण खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होऊन आणि त्यातून पोषक द्रव्ये शोषण्याची प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी आपल्या शरीरात पुरेसे उबदार वातावरण किंवा अम्लीय वातावरण असणे खूप महत्वाचे असते. परंतु आपण जर लगेच पाणी प्यायल्यामुळे पोटाचे वातावरण अगदी थंड होते. त्यामुळे आपण खाल्लेले अन्न पाहिजे तसे पचन होत नाही. जर आपण कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी पिले तर ते अन्न सरळ आतड्यात ढकलले जाते. अशा प्रकारे आपल्याला खाल्लेल्या अन्नाचा पूर्णपणे लाभ मिळत नाही.
दूध प्यायल्यानंतर नेमकं किती वेळाने पाणी प्यायला पाहिजे ?
फक्त दूधच नाही तर कोणतेही पदार्थ किंवा जेवण जेवायच्या अगोदर किमान २५ ते ३० मिनिटे किंवा जेवण केल्यानंतर ३० ते ४५ मिनिटानंतर पाणी प्यायचे आणि ते ही एक - एक घोट हळुहळु पाणी पिऊ शकतो. परंतु आपण खाल्लेले अन्न किंवा दूध प्यायल्यानंतर त्यातील सगळी महत्वाची असणारी पोषणमूल्य आपल्याला मिळावी असे वाटत असल्यास ४५ ते ५० मिनिटांनंतर पाणी प्यावे.
वर देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर दिली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी h तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...