आता पेट्रोल-डिझेलही होणार स्वस्त...! मोदी सरकार सामान्यांना देणार दिलासा
Author -
kdmarathi
August 29, 2023
आता पेट्रोल- डिझेलही होणार स्वस्त. मोदी सरकार सामान्यांना देणार दिलासा.
केंद्र सरकारने आता घरगुती LPG सिलेंडर च्या किमतीत 200 रुपयांची घट करण्याची घोषणा केली आहे.
देशात वाढत असणाऱ्या महागाई वरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. यामध्येच आता राखी पौर्णमे अगोदर केंद्रातील मोदी सरकारने सामान्य कुटुंबाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती LPG सिलेंडरच्या किमती मध्ये 200 रुपयांची घट करण्याची घोषणा केली आहे. महागाईने होरपळून निघणाऱ्या सर्वसाधारण कुटुंबांना हा मोठा दिलासा आहे. या निर्णयानंतर आता पेट्रोल व डिझेलच्या किमतीतही कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मागील बऱ्याच दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. अशा परीस्थितीत केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेल च्या किमती कमी करण्याची घोषणा केली जाऊ शकते. 2022 मध्ये झालेल्या UP यूपी विधानसभा निवडणुकी पूर्वी केंद्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीत मोठी कपात केली होती.
CNG च्या किमती कमी होईल का
घरघुती गॅस सिलेंडर चे दर २०० रुपयाने कमी केल्याचे स्वागत आहे. पण त्यामुळे महागाई आटोक्यात येइल का? तर नाही. त्यासाठी CNG चे दर सरकारने कमी करावे. यासंदर्भात आम्ही राज्य, केंद्र प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.
टॅक्सी, रिक्षा, व इतर वाहनात वापरण्यात येणाऱ्या CNG च्या दरात ४० % टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे. त्यामूळे CNG वर चालणाऱ्या सर्व वाहन चालकांनाच फायदा होईल असे नाही. तर दर कमी केल्यास प्रवाशांना महागाईचा मोठा फटका लागणार नाही. याकडे सरकारने लक्ष दिले पाहीजे.
घरघुती (Gas Cylinder) गॅस सिलेंडर २०० /- रुपयाने स्वस्त केल्यामुळे मध्यवर्गीयांना व इतर सर्व कुटुंबांना फायदा होईल. पण त्याचा परिणाम महागाई कमी होण्यावर पडणार नाही. उपहारगृहे, हॉटेल, वडा पाव व इतर स्टॉलवर व्यावसायिक वापराचे Gas Cylinder वापरले जातात. त्या सिलेंडर क्या किंमती कमी झालेल्या नाही. त्यामुळे घराबाहेरील किंवा स्टॉल वरचे अन्न पदार्थांच्या किमती तसेच राहणार आहे. परिणामी सामान्य जनतेला त्याचा काही दिलासा मिळणार आहे.
या घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र या घेतलेल्या निर्णयाचा फायदा तेव्हाच होणार जेव्हा सिलेंडर ची किंमत ५०० /- ते ६०० /-रुपयांपर्यंत येईल. या घेतलेल्या निर्णयामुळे गृहिणींच्या बजेटवर कोणताही प्रकारचा परिणाम होणार नाही. कारण की ११००/- रुपयांचा गॅस सिलेंडर आजही ९००/- रुपयांना घ्यावा लागणार आहे.
२००/- रुपयांनी गॅस सिलेंडर ची किंमत कमी झाली आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना व गरिबांना दिलासा जरी मिळत असला तरीही या किमती आणखी कमी करण्यासाठी सरकारने यावर भर द्यायला हवा. आजरोजी दूध, भाजीपाला, व बाजारातील इतर वस्तू यासर्वच गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे रोज काम करून कमाऊन घरातील खर्च किंवा बजेट सांभाळणे कठीण झाले आहे.
अलीकडेच बाजारात टोमॅटोचे भाव प्रती किलोमागे २५०/- रुपयांच्या पुढे गेले होते. त्यानंतर सरकारला यामध्ये सक्रिय व्हावे लागले आणि नेपाळमधून टोमॅटो आयात करावे लागले. टोमॅटोच्या झालेल्या किंमत वाढीत दिलासा मिळण्यापूर्वीच कांद्याच्या किमतीत तेजी दिसून आली. पाले भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारवर मोठा ताण निर्माण झाला होता.
जुलै मध्ये किरकोळ महागाईचा दर हा ७.४४% टक्के होता. हा गेल्या १५ महिन्यांतील सर्वोच्च दर आहे. वाढत्या महागाइमुळे सरकार अडचणीत आले आहे. अशा परीस्थितीत सरकारने LPG गॅसच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता पेट्रोल व डिझेलच्या किमतीत कपात होण्याची अपेक्षा आहे.