आता वीज जाणार असेल तर तुम्हाला मिळणार मोबाइलवर सूचना; तुम्ही मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली का ?
महावितरण कंपनीकडे ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केल्यास आपल्याला बिलासंबंधी तसेच वीज पुरवठा कधी खंडित होणार, कधी पूर्ववत होणार व महत्त्वाचे म्हणजे वीज बिल भरण्याबाबत मोबाइलवर माहिती देण्यात येते. कोपरगाव शहर या विभागात ( २४,६०४ ) इतक्या ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंद केली आहे.
महावितरण कंपनीच्या कोपरगाव शहर विभागात २५,४३९ एकूण ग्राहक आहेत. त्यापैकी २४,६०४ ग्राहकांनी आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंद केली आहे.
महावितरण कंपनी सोबत मोबाइल क्रमांकाची नोंद कशी करायची? कुठे करायची आता मोबाइल क्रमांकाची नोंदणी?
महावितरण कंपनीची अधिकृत वेबसाईट ( pro.mahadiscom.in/Consume rinfo/consumer.jsp ) या लिंकवर क्लिक करून ग्राहक स्वतः मोबाईल क्रमांकाची नोंदणी करू शकतात तसेच महावितरण कंपनीने ग्राहकांच्या सोयी-सुविधांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकी एसएमएस ( SMS ) ही योजना आहे. या सुविधेचा लाभ कोपरगाव विभागातील साधारणतः ९५ % टक्के ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. आणि उर्वरित ग्राहकांनीही आपले मोबाइल क्रमांक नोंदवावेत.
एसएमएस ( SMS ) द्वारे मिळते सुविधा
• वीज बिल ( Electricity bill) किती ? नोंदणी केलेल्या एकूण २४,६०४ ग्राहकांना एसएमएस SMS सुविधा देण्यात आली आहे.
त्याद्वारे त्यांना वीज बिल किती आहे, याची माहिती प्रत्येक महिन्याला देण्यात येते.
• या वेळेत जाणार वीज- एसएमएस SMS द्वारे मीटर रीडिंगची माहिती, वीज बिल भरण्याबाबतची माहिती, लाइन बंद केव्हा होणार त्याबाबतची माहिती, व डिस्कनेक्शन नोटीस यांची माहिती दिली जाते.