आयटीआय उत्तीर्ण झालेले तरुणही सैन्यात होऊ शकतात अग्निवीर; जाणून घ्या सविस्तर...!
टेक्निशियन, फिटर, मोटर मेकॅनिक यासह अनेक पदांवर ही भरती केली जाते.
भारतीय सैन्यात तरुणांची भरती आता अग्निवीर ( AGNIVEER ) अंतर्गत केली जात आहे. आयटीआय पास व डिप्लोमाधारकही भारतीय लष्करात अग्निवीर ( AGNIVEER ) होऊ शकतात. त्यासाठी सैन्यदलामार्फत टेक्निकल शाखेतून केली जाते. फिटर, मोटर मेकॅनिक, टेक्निशियन, यासह अनेक पदांवर ही भरती केली जाते. अर्ज लष्कराच्या अधिकृत असणाऱ्या आवेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे केले जातात.
अर्ज करण्यासाठी तरुणांनी संबंधित असणाऱ्या ट्रेडमध्ये ( ITI ) आयटीआयसह दहावी उत्तीर्ण असले पाहिजे. भरतीसाठी असणाऱ्या लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अर्ज करताना उमेदवारांना आपली सर्व शैक्षणिक व इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अग्निवीर भरतीमध्ये आयटीआय उत्तीर्ण तरुणांना सैन्य इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य दिले जाते. त्यांना किमान 20 ते कमाल 50 गुणांपर्यंतचा बोनस देण्यात येतो.
कोणकोणत्या पदांवर केली जाते भरती
टेक्निकल श्रेणी अंतर्गत, मेकॅनिक , इलेक्ट्रॉनिक्स, आणि कम्प्युटर यांसारख्या क्षेत्रांसाठी भरती असते. तसेच, टेक्निकल सहाय्यक श्रेणीमध्ये लेखा, लिपिक,स्टोअरकीपर, यासारख्या पदांवर भरती केली जाते. कारपेंटर, फिटर, वेल्डर, मोटार मेकॅनिक आणि टेक्निशियन अशा अनेक पदांवर भरती केली जाते.
अशी केली जाते निवड
या पदांवरील उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी , लेखी चाचणी, आणि वैद्यकीय तपासणीनंतर केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना लष्कारतर्फे प्रशिक्षण देखील देण्यात येते. त्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात येते.
अशाप्रकारे करा अर्ज.
लष्कराच्या वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जा.
• नोटिफिकेशनवर ( NOTIFICATION )क्लिक करा आणि वाचा. -
• अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा. -
- त्यामध्ये सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा.
- आणि सबमिट करा.
आता अग्निवीर (AGNIVEER) अंतर्गत 4 वर्षांसाठी सैन्यात तरुणांची भरती होते. याबरोबर बारावीनंतर एक वर्षाचा आयटीआय डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना 30 गुणांचा बोनस देण्यात येतो. तर बारावीनंतर दोन वर्षांचा आटीआय डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना जवळपास 50 गुणांचा बोनस दिला जातो.