अलिकडच्या काळात चुकीच्या घेतलेल्या आहारामुळे तसंच बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातच अनेक प्रकारच्या आजारांचा तरुणांना सामना करावा लागतो.कोलेस्ट्रॉल, मधुमेह, तसंच हाय ब्लड प्रेशर ( High Blood Pressure) म्हणजेच उच्च रक्तदाबासारख्या समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या इतर गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाची ( High Blood Pressure ) समस्या वाढताना दिसत आहे. ज्या व्यक्तीचं ब्लडप्रेशर 140/90 mmHg किंवा याहून जास्त असल्यास त्याला हाय ब्लड ब्रेशर (Blood Pressure) किंवा हायपरटेंशन असं म्हंटलं जातं.
भारतामध्ये दर ३ पैकी एक व्यक्ती हा उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त आहेत. रक्तदाब जास्त असल्यास त्याचा किडनीवर (Kidney) परिणाम होतो तसंच स्ट्रोक आणि हार्ट अटॅकसारख्या ( Heart Attack) जीवघेण्या समस्यांचा धोका वाढतो.
हे सुद्धा वाचा
High Blood Pressure नियंत्रित करण्यासाठी या फळांचे करा सेवन येथे वाचा Click Here
उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही समस्या साधारण असल्याचा अनेकांचा समज असतो. परंतु जर ही समस्या कायम राहिली तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतात. यासाठीच रक्तदाब नियंत्रणात राखणं गरजेचं आहे.
अनेकवेळा तुमच्या दिनचर्येतील सर्वसाधारण चुका व काही सामान्य कारणांमुळे देखील रक्तदाब वाढू शकतो. यासाठीच काही गोष्टींपासून दूर राहिल्यास किंवा काळजी घेतल्यास High Blood Pressure च्या समस्ये पासून सुटका करून घेऊ शकतो.
दीर्घकाळासाठी लघवी रोखणं
अनेकजण प्रवासामध्ये तर काहीजण सतत उठण्याचा कंटाळा येतो म्हणून दीर्घकाळासाठी लघवी रोखून ठेवतात. परंतु याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतो. दीर्घकाळासाठी लघवी रोखून ठेवल्यास ब्लॅडरवर दबाव निर्माण होवून स्नाय़ू खेचले जातात. यामुळे स्नायू कुमकुवत होतात. परिणामी दीर्घकाळामध्ये ( High Blood Pressure ) उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होवू शकते.
सर्दी खोकल्याच्या औषधांचं सेवन करणे
सर्दी खोकल्याच्या औषधांचं म्हणजेच डिकंजेस्टंट्सच नेहमी सेवन केल्याने रक्तवाहिन्यांवर परिणाम होवू शकतो. यामुळे हाय ब्लड प्रेशरची( High Blood Pressure) समस्या निर्माण होवू शकते. म्हणून जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला येत असेल तर काही आयुर्वेदिक तसंच घरगुती उपाय करण्यावर भर द्यायला हवा.
सतत पेनकिलर घेणे
सर्दी , खोकला या औषधां प्रमाणेच पेनकिलर घेतल्याने देखील रक्तदाब Blood Pressure वाढण्याची शक्यता बळावते. अनेकांना थोडीफार पोटदुखीं, डोकेदुखी, किंवा शरीरात इतर वेदना झाल्यास नेहमी पेनकिलर घेण्याची सवय असते. परंतु ही सवय महागात पडू शकते. पेनकिलरच्या जास्त सेवनामुळे रक्तदाब Blood Pressure वाढण्यासोबतच, किडनीवर परिणाम होत असतो.
एकटे पणा
अलिकडे सोशल मीडियाच्या जास्त वापरामुळे अनेकजण प्रत्यक्षात मित्र-मैत्रिणींमध्ये किंवा नातलगांमध्ये जाणे किंवा भेटीगाठी घेणं टाळतात. यामुळे एकाकीपणा वाढत जात आहे. एकाकीपणामुळे नैराश्य येण्याची व चिंता वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे ब्लड प्रेशर Blood Pressure वाढू शकतं.
डिहायड्रेशन (Dehydration)
डिहायड्रेशन म्हणजेच शरिरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास रक्तवाहिन्यांवर परिणाम होवून Blood Pressure रक्तदाब वाढू शकतो.
यासाठीच दैनंदिन आयुष्यात या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून ( High Blood Pressure) उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून दूर राहता येईल.
वरील देण्यात आलेली माहिती ही सर्वसाधारण माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...