तुम्हालाही चमच्याने जेवायची सवय आहे का? मग अशी घ्या काळजी...!


तुम्हालाही चमच्याने जेवायची सवय आहे का? 

 आजच्या तरुण पिढीतील बऱ्याचशा लोकांमध्ये चमच्याने खाण्याची सवय वाढत चालली आहे. जेवण कोणत्याही प्रकारचे असो पण त्यांच्या हातामध्ये लगेच चमचा येतो. हा प्रकार भारतात इंग्रजांनी आणला हे तर खरं आहे. पण, आता तिकडचेच बरेचसे लोक हाताने चमच्याचा वापर न करता जेवण करतात आणि भारतीय लोकांचा कल चमच्याने खाण्याकडे वाढत आहे. परंतू  हाताने अन्न खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही फायदे शरीराला खूप लाभदायक ठरतात.


 चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खाणे चांगले फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. तुमची पचनशक्ती मजबूत व्हावी असे वाटत असेल तर हाताने खायला हवे. हाताने खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, असेही म्हटले जाते. आयुर्वेदानुसार, हाताने खाल्ल्याने अन्न लवकर पचन होते. जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने जेवण जेवता तेव्हा तुम्ही ते पूर्ण चवीने खातात आणि त्यामुळे अन्नाला एक वेगळीच चव येते.


ऍपेटिट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका माहितीनुसार, जेव्हा तुम्ही हाताने अन्न खाता तेव्हा तुमच्या हातांच्या स्नायूंना चांगल्या प्रकारे व्यायाम मिळतो. हाताने खाण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. जी आजची पिढी विसरत  आहे. पण आजही बहुतांश लोक हाताने खाणे पसंत करतात. त्यांना या प्रकारे खाणे देखील आरामदायक वाटते. आयुर्वेदानुसार सांगितले जाते की बोटांमध्ये असलेल्या मज्जातंतूंमुळे पचन सुधारते. खरं तर, जेव्हा तुम्ही हाताने खातात, तेव्हा तुम्हाला  चव,  पोट, आणि सुगंध याविषयी अधिक माहिती असते, कारण तुम्ही हाताने खाता.


हाताने जेवण खाल्ल्याने रक्ताभिसरणही सुधारते. यामुळे बोटांच्या आणि हातांच्या स्नायूंचा सुद्धा व्यायाम होतो, ज्यामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारते. तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांची हालचाल जितकी अधिक सुरळीत ठेवाल तितका रक्तप्रवाह सुरळीत राहील. कडधान्य, भात, भाज्या एकत्र करून खातात किंवा चपाती मोडताना बोटांची हाडे आणि सांधेही व्यवस्थित काम करतात.


टीप :- तुम्ही जेवण्यापूर्वी तुमचे हात पूर्णपणे स्वच्छ करावे. अन्यथा हातामध्ये असलेले बॅक्टेरिया, हानिकारक जंतू, नखे तुम्हाला आजारी बनवू शकतात.