पी. एम. किसान (PM KISAN ) योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांना आवाहन : ई- केवायसी आणि बँक खाते आधार सीडिंग पूर्ण करा.
"पी.एम.किसान" योजनेअंतर्गत प्रलंबित ई- केवायसी व आधार सीडिंग दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावे अन्यथा त्यानंतरची प्रलंबित ई- केवायसी व आधार सीडिंग ग्राह्य धरली जाणार नाही व प्रलंबित असलेले नांवे पी.एम. किसान योजनेतून रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कैलास ढेपे, तालुका कृषी अधिकारी देवगड यांनी दिली आहे.
हे सुध्दा वाचाई-पीक पाहणी,अशी करा ई पीक पाहणी.
पीएम किसान योजना प्रलंबीत ई केवायसी व आधार सिडींग
पी.एम.किसान योजनेअंतर्गत सन 2019- 20 पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. "प्रधानमंत्री किसान सन्मान" निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमि अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केलेले आहेत. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई-केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न करणार नाहीत त्यांची नावे पी.एम.किसान योजनेतून वगळण्यात येणार आहे.
ई-केवायसी व आधार सीडिंग करण्याकरिता आतापर्यंत बऱ्याच वेळा मोहीम राबविण्यात आलेली असून प्रलंबित लाभार्थ्यांशी संपर्क करून सुद्धा देवगड तालुक्यातील अद्याप 1112 लाभार्थ्यांचे ई-केवायसी आणि 1735 लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सीडिंग प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. वारंवार संपर्क करूनही ई-केवायसी व आधार सीडिंग करण्याकरिता जे लाभार्थी प्रतिसाद देत नाहीत अशा लाभार्थ्यांचे नावे वगळण्यात यावे अशा शासन स्तरावरून सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात बी -बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी आर्थिक मदत म्हणून शासनाकडून पी.एम.किसान योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत आहे.तरी सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी ई-केवायसी आणि आधार सीडिंग दिनांक 10 सप्टेंबर पूर्वी पूर्ण करावी अन्यथा शासनाकडून पंधरावा हप्ता प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी.
ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...