सतत थकवा येतोय, रक्ताचे प्रमाण कमी झाले? हे ४ पदार्थ खा, रक्त भरपूर वाढेल.

 


सतत थकवा येतोय, रक्ताचे प्रमाण कमी झाले? हे ४ पदार्थ खा, रक्त भरपूर वाढेल.

रक्ताचे प्रमाण कसे वाढवायचे : शरीरात रक्ताची कमतरता असल्यास कोणतंही काम करण्यात लक्ष लागत नाही व थकवा आल्यासारखा जाणवतो.

आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास थकवा येणे, कामाचा कंटाळा आल्यासारखं वाटणे अशी लक्षणं जाणवतात. रक्ताच्या माध्यमातून शरीराच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात ऑक्सिजन व पोषक तत्व पोहोचतात. कार्बन डायऑक्साईड सारखे इतर पदार्थही बाहेर निघतात. एका निरोगी व्यक्तीच्या शरीरात जवळपास ५ ते ६ लिटर रक्त असायला पाहिजे. (foods for iron deficiency) शरीरात रक्ताची कमतरता असल्यास कोणतंही काम करण्यात लक्ष लागत नाही, अशक्तपणा, थकवा, मूड स्विंग्स जाणवतात या स्थितीला एनिमिया असं म्हणतात. रक्ताची कमतरता असल्यास या ज्यूसचे सेवन करावे.

...

दुचाकीच्या किमतीत आता खरेदी करा इलेक्ट्रिक कार Electric car

येथे क्लिक करा/Click Here 

...

बीट या फळांचा रस 

बीटात आयर्नचे प्रमाण जास्त असते. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, आणि व्हिटामीन सी सुध्दा असते. बीट या फळांचे सेवन केल्याने रक्तातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. गाजर, बीट, काकडीचा तुकडा घालून तुम्ही याचा ज्यूस करून पिऊ शकता.

हिरव्या पाले-भाज्यांचा रस

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ग्रीन ज्यूस म्हणजेच मोसंबी, पालक, संत्री, या फळांचाही यात समावेश आहे. ग्रीन ज्यूसमध्ये आयर्नबरोबर फॉलिक एसिड, फॉलेट, व्हिटामीन सी, कॉपर आणि व्हिटामीन ए असते ते रक्ताची कमतरता भरून काढते.

पालकाचा या भाजीचा ज्यूस

पालक, रास्पबेरी, काजू, या भाज्या शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करतात हा ज्यूस प्यायला खूप चवदार लागतो. पालकाचा ज्यूस बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर १ वाटी ताजा पालक, २ कप स्ट्रोबेरी / २ चमचे बदाम आणि १ कप प्रोटीन पावडर मिसळा यात कोकोनट किंवा बदामाचे दूध मिक्स करून सेवन करा.

डाळिंबाचा रस

डाळींबाचा रस लाल असतो त्याचप्रमाणे डाळिंब या फळांचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात आणि शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार डाळिंबात भरपूर प्रमाणात व्हिटामीन सी असते ज्यामुळे रक्तामध्ये हिमोग्लोबीनची कमतरता भासत नाही. कमकुवतपणा, थकवा, जाणवत नाही. याशिवाय तुम्ही मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर गूळ चने, गूळ शेंगदाणे आणि खजूर, गूळ आणि तीळ खाऊ शकता.