आता मोबाईल सिमकार्ड होणार e-SIM..!
e-SIM | या आधुनिक जगात तंत्रज्ञानात खूप बदल होत आहे. असेच e-SIM अशीच एक क्रांती घेऊन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोबाईलच्या स्लॉटमधील सिम कार्डची असलेली जागा हे एक नवं तंत्रज्ञान घेणार आहे. त्यामुळे आता सिम कार्डची आवश्यकता पडणार नाही. कोणत्याही प्रकारच्या अडचणीशिवाय ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. आहे तरी
या तंत्रज्ञान बद्दल
आपल्याकडे असलेल्या स्मार्टफोनपासून ते डाटा कनेक्टिव्हिटीपर्यंत सर्वच ठिकाणी सिम कार्डची आवश्यकता आहे. Sim card सिम कार्ड ही एक प्रकारची ग्राहकांची ओळखच बनली आहे. एखाद्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक त्याच्याकडे असलेल्या सिम कार्डमुळे मिळतो असे हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग सुरु असतात. तसेच आता e-SIM ट्रेंड बाजारात येणार आहे. मोबाईलच्या स्लॉटमधील सिमकार्डची ते जागा घेईल त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या सिम कार्डशिवाय कॉलिंग, डाटा, एसएमएस या सेवा मिळतील त्यासाठी सिम कार्डची आवश्यकता पडणार नाही अर्थातच लवकरच देशात सिमकार्ड ची जागा e-SIM घेईल, असे मत एअरटेलचे Airtel सीईओ गोपाल विट्टल यांनी व्यक्त केली आहे.
![]() Google pay, Paytm आणि Phonepe १ जानेवारी पासून होणार बंद. सविस्तर वाचा...!येथे क्लिक करा/Click Here |
e-SIM बाबात दिले हे संकेत
दूरसंचार कंपनी एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांच्या म्हणण्यानुसार सिम कार्डपेक्षा ई-सिम हा एक चांगला पर्याय ठरेल. अनेक प्रकारच्या स्मार्टफोन कंपन्या व डेटा डिव्हाईस निर्मिती कंपन्या याविषयीचा पर्याय देत आहेत. तर दुसरीकडे टेलिकॉम कंपन्या ई-सिमची ऑफर देत आहेत, ई-सिममुळे तुमचा फोन चोरी झाल्यास त्यातील डाटा ट्रान्सफर करता येईल. व त्यासोबत या चोऱ्यांच्या प्रकारांना आळा बसेल.
ई-सिम कार्ड सेवेमुळे सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे अनेक प्रकारच्या डिव्हाईस सोबत तुम्हाला एकाचवेळी एकाच क्रमांकावरुन जोडणी करता येईल. मोबाईल फोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत सर्व डिव्हाईस याला इंटरकनेक्ट करता येतील व तसेच ग्राहकांना सर्व दूरसंचार सेवा मिळतील. म्हणजेच आता मोबाईलऐवजी तुम्हाला स्मार्टवॉचचा वापर करायचा आहे, अथवा इतर अनेक मोबाईलचा वापर करायचा असेल तर ई-सिम च्या मदतीने वापरता येईल येईल.
चोरांना बसणार याचा फटका
ई-सिमच्या वापरामुळे सिम कार्ड हरवण्याचे व चोरी होण्याची भीती राहणार नाही. मोबाईल चोरी करणारे मोबाईवर हात साफ केल्यानंतर त्यातील सिम कार्ड काढून फेकून देतात व चोरीचा मोबाईल काही तासातच देशातील वेगवेगळ्या शहरात त्याची विक्री केली जाते. परंतु आता या ई-सिममुळे या फोनचे लोकेशन मिळेल, आणि तो चोरी केलेला मोबाईल ट्रॅक करणे सोपे होईल.
e-SIM चा वापर करण्यासाठी काय करावे
जर तुम्हाला ई-सिमचा वापर करायचा असेल तर सर्वात अगोदर फोनमध्ये तशी व्यवस्था व त्याची तशी क्षमता आहे का हे तपासा. जर तुमच्याकडे असलेला फोन ई-सिमला सपोर्ट करत असेल तर अगोदर टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क करावा लागेल. सध्या आता जिओ, एअरटेल Vi, ई-सिमचा पर्याय देत आहेत.