तुम्ही Google pay, Paytm आणि Phonepe वर UPI वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी महत्वाची आहे.
वास्तविक पाहता, NPCI या संस्थेने ३१ डिसेंबर पासून अनेक upi युजर्सचे UPI आयडी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. NPCI ने Google Pay, Phone Pay आणि Paytm साठी एक परिपत्रक तयार केले आहे. ज्याच्यामध्ये असे सांगितले आहे की, जो UPI आयडी मागील एका वर्षासाठी अॅक्टिव्हेट केला गेला नाही किंवा म्हणजेच ज्या वापरकर्त्यांनी मागील एक वर्षापासून त्यांच्याकडे असलेल्या UPI आयडी वरून कोणत्याच प्रकारचा व्यवहार केला नाही, असे upi id बंद करण्यात येईल. ज्यांच्याकडे त्यांचे जुने upi id असतील अशा वापरकर्त्यांनी त्यांचे UPI आयडी 31 डिसेंबर 2023 पर्यंत सक्रिय करून घ्यावेत नाहीतर ते एक जानेवारीपासून बंद करण्यात येतील.
चुकीच्या व्यक्तीच्या upi id वर पैसे ट्रान्सफर होऊ नयेत.
आता ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीच्या अनेक प्रकारच्या घटना समोर येत आहेत. तसेच जेथे ऑनलाइन UPI आयडीद्वारेही मोठ्या प्रमाणात घोटाळे होत आहेत, अशा परिस्थितीत ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या UPI पेमेंट च्या माध्यमातून होणारे घोटाळे थांबवण्यासाठी NPCI संस्थेने हा आदेश दिला आहे. अनेक वेळा upi वापरकर्ते त्यांच्याकडे असलेला जुना नंबर डिलिट न करता नवीन upi आयडी तयार करतात, ज्यामुळे ते एक फसवणुकीचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत NPCI कडून जुने ओळखपत्र बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
![]() LPG सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घसरण,जाणून घ्या सविस्तर...!येथे क्लिक करा/Click Here |
NPCI ला आशा आहे की या केलेल्या नवीन नियमांमुळे चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जाण्यापासून प्रतिबंध होईल, व पैसे हस्तांतरण थांबवता येईल. अलिकडच्या काळात online व्यवहारातील अशे अनेक फसवणुकीचे प्रकरणे उघडकीस आले आहेत. नवीन फोन सोबत लिंक केलेला UPI आयडी लोक अनेकवेळा बदलतात, तो मोबाइल नंबर डिलिट करण्याचे लक्षात न ठेवता बदलतत. काही दिवसांपासून तो नंबर वापरात असल्याने समोरच्या व्यक्तीला त्याचा वापर करण्याचा प्रवेश मिळतो. तसेच या मोबाईल क्रमांकाशी फक्त पूर्वीचा UPI आयडी लिंक केलेला असेल अशा परिस्थितीत चुकीचे व्यवहार वाढण्याची शक्यता वाढते. म्हणून नवीन नियमानंतर आता नव्या वर्षापासून या धोक्याची भीतीही कमी होण्याची शक्यता आहे.
NPCI हे UPI आयडी बंद करणार
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत जी तुमचा UPI आयडी निष्क्रिय करेल. Paytm, PhonePe, आणि Google Pay सारख्या सर्व बँका आणि तृतीय पक्ष असलेल्या अॅप्स त्या UPI आयडी बंद करणार आहेत ज्यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झाला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश
तुमचा असलेला जुना नंबर नवीन वापरकर्त्याला त्याचा चुकीचा उपयोग केला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितल्याप्रमाणे त्या स्थितीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून या सर्व कारणांमुळे जुना आयडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि सुप्रीम कोर्टाने आपल्या घेतलेल्या निर्णयात सांगितले आहे की दूरसंचार प्रदाता कंपन्या 90 दिवसांनंतर निष्क्रिय केलेले नंबर बंद करू शकतात. तसेच तो बंद केलेला नंबर दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकते.
टीप - जर तुमचा UPI आयडी गेल्या एका वर्षापासून सक्रिय असेल, म्हणजेच त्या UPI आयडीने व्यवहार केले जात असतील तर त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही.