LPG सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घसरण, केंद्र सरकारने दिला दिलासा
देशातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घट करण्यात आली. केंद्र सरकारने दिले मोठे गिफ्ट. सिलेंडरच्या किंमतीत घसरण झाल्याने महागाई आटोक्यात येण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता आहे. सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याने हॉटेल व बाहेरील खाद्यपदार्थ स्वस्त मिळतील असे दिसून येईल.
देशातील चार प्रमुख शहरातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे दिवाळीचा सण संपला असला तरी उत्तर भारतात छट पुजेचे अनन्यसाधरण महत्व आहे. या काळात केंद्र सरकारने हा दिलासा दिला आहे नवीन किंमती गुरुवारपासून लागू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी केल्या आहेत, एल पी जी सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची कपात करण्यात आली आहे, त्यामुळे देशभरातील प्रमुख शहरांमधील सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत.
१५ दिवसांपूर्वी दरवाढ झाली होती
केंद्र सरकारने १५ दिवसांपूर्वी १ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत १०१.५०/- रुपयांची वाढ केली होती. तर यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किंमती दिल्लीत १७३१.५०/- रुपये, कोलकत्तामध्ये १८३९.५०/- रुपये, मुंबईमध्ये १६८४/- रुपये तर चेन्नई मध्ये ह्या किमती १८९८/- रुपये होता.
...
![]() आता पुन्हा शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळणार सब्सिडी, सविस्तर जाणून घ्या!येथे क्लिक करा/Click Here |
LPG सिलेंडर च्या आता किती आहेत किंमती
देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक उपयोगासाठी वापरले जाणारे सिलेंडर ५७.५०/- रुपयांनी स्वस्त झाले. आता १९ kg किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती दिल्लीत १७७५.५०/- रुपये झाली आहे. १ नोव्हेंबर रोजी याची किंमत १८३३/- रुपये होता. कोलकाता, चेन्नई व मुंबई मध्ये पण किंमती कमी झाल्या आहेत.
कोलकत्तामध्ये १८८५.५०/- रुपये,
मुंबईत १७२८/- रूपये
चेन्नईमध्ये १९४२/- रुपये झाली आहे.
१ नोव्हेंबर रोजी हा भाव मुंबई मध्ये १७८५.५०/- रुपये, कोलकत्तामध्ये १९४३/- रुपये, आणि चेन्नईमध्ये १९९९.५०/- रुपये होता.
घरगुती सिलेंडरच्या किंमती
गेल्या काही वर्षांपासून LPG Gas सिलेंडरचे भाव सातत्याने वाढत आहेत, काही वर्षापूर्वी ५००/- रुपयांपेक्षा स्वस्त मिळणारे गॅस सिलेंडर आता एक हजारांच्या जवळपास मिळत आहे. काही दिवसां अगोदर केंद्र सरकारने २००/- रुपयांची सबसिडी दिली होती. त्यानंतर दिल्लीत १४.२ kg किलोग्रॅम सिलेंडरची किंमत ९०३/- रुपये, कोलकत्तामध्ये ९२९/- रुपये, मुंबईत ९०२.५०/- रुपये व चेन्नईत हा भाव ९१८.५०/- रुपये होता.
काही दिवसापूर्वी झालेली घट
गेल्या ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय कॅबिनेटने पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ९.५ कोटी लाभार्थ्यांना १००/- रुपयांची सबसिडी मंजूर केली होती. यापूर्वी केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात देशातील सर्वसामान्य जनतेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २००/- रुपयांच्या सबसिडीला मंजूरी दिली होती. सध्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एक सिलेंडरसाठी ६०३/- रुपये द्यावे लागतात. तर सर्वसामान्य जनतेला दिल्लीत ९०३/- रुपये द्यावे लागतात . प्रत्येक शहरात या किंमतीत वेगळेपणा दिसून येतो.