इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबईमध्ये दाखल झाली आता वेगवेगळ्या रंगातील पर्यायांमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटर; आता बाकीच्या कंपन्यांची होणार सुट्टी!
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे भारतीय बाजारात कंपन्या नवनवीन वाहन आनत आहेत. आता कायनेटिक ग्रीन ‘Kinetic Green' या भारतातील अग्रगण्य असलेल्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने मुंबईतील एका कार्यक्रमात नवीन मेड इन इंडिया "made in India" ची इलेक्ट्रिक स्कूटर, ‘Kinetic Green Zulu’ सादर केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ई-स्कूटरला Power देण्यासाठी २.२७ kWh ची लिथियम-आयन बॅटरी बसवण्यात आली आहे. एकवेळ बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर १०४ किमी पर्यंत जाऊ शकते, असे या कंपनी च्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन जवळपास ९३ किलोग्रॅम असून ती कमीत कमी १५० किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकते आणि या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ६० Km/h आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ऑटो कट चार्जर, साइड स्टँड सेन्सर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, अंडरसीट स्टोरेज लायटिंग, एलईडी डीआरएल यांसारखी फीचर्स आहेत. कंपनीने सहा रंग पर्यायासह ही स्कूटर लाँच केली व क्लाउड ग्रे, एफबी ब्लू, ब्लॅक एक्स, पिक्सेल व्हाईट, इन्स्टा ऑरेंज आणि यूट्युब रेड अशा रंग पर्यामध्ये ही स्कूटर ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Zulu EV स्कूटरचे डिझाईन स्टायलिश प्रकारचे बनवण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरला ऍप्रॉन-माउंट एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे व एलईडी हेडलॅम्प DRL हँडलबार स्टॉकच्या वर दिलेला आहे. स्कूटरला स्पोर्टी sport लूक देण्यात आला आहे. Kinetic Green Zulu EV या स्कूटरची लांबी जवळपास १,८३० मिमी, उंची १,१३५ मिमी आणि रुंदी ७१५ मिमी देण्यात आली आहे. स्कूटरमध्ये १६० मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि १,३६० मिमी व्हीलबेस देण्यात आला आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरला चार्जिंग करण्यासाठी जवळ्पास पाच तास लागतात
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक फक्त आणि फक्त ४९९ रुपयांच्या किंमतीमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९४,९९० (एक्स-शोरूम, मुंबई) रुपये आहे तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरची पाच वर्षांची वॉरंटी देखील मिळते.
ही नवीन ई-स्कूटर, ZULU आता देशभरातील सर्व Kinetic Green डीलरशिपवर व Amazon आणि Flipkart वर उपलब्ध आहे.