पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 7000 हजार रुपये
सर्वात खात्रीशीर व सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस ( Post Office) हा आहे. पोस्ट ऑफिस हे सर्वसामान्य नागरिकांसाठी छोट्या-छोट्या व विविध बचत योजना राबवत असते. पोस्ट ऑफिस च्या या स्कीम मध्ये पती-पत्नीच्या जॉइंट अकाऊंट उघडून त्यामधून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते. पोस्ट ऑफिस मध्ये Post Office Monthly income Scheme (POMIS) मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये गुंतवणूकदार सिंगल किंवा जॉईंट अशा दोन्ही प्रकारे खाते उघडू शकतात. या योजनेतील व्याजदरात केंद्र सरकारने 1 एप्रिल, 2023 पासून वाढ केली आहे आणि तसेच गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांनी ज्या दिवशी पैसे डिपॉझिट केले, त्यानंतर एक वर्षात तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता आणि जर एक ते तीन वर्षांच्या काळात खात्यातून पैसे काढले, तर त्यावर तुम्हाला 2% शुल्क आकारले जाते आणि त्यानंतर शुल्क वजा करून शिल्लक राहलेली रक्कम तुम्हाला परत दिली जाते. तीन वर्षानंतर गुंतवणूकदाराने जर असलेल्या मुदतीपूर्वी खाते बंद केले, तर जी काही तुम्ही जमा केलेली रक्कम आहे, त्यावर 1% रक्कम वजा केली जाते. पोस्ट ऑफिस च्या या योजनेमध्ये दोन किंवा तीन खातेदार यामध्ये संयुक्त खाते उघडू शकतात, व तसेच यामध्ये संयुक्त असलेल्या खात्याचे रूपांतर हे एका सिंगल खात्यामध्ये करता येते. तसेच एक गुंतवणूकदार असलेल्या खात्याचे रूपांतर संयुक्त खात्यामध्येही करता येऊ शकते.
एक रक्कमी गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो.
गुंतवणूकदार या योजनेअंतर्गत एका खात्यामध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि सरकारने संयुक्त खात्याची मर्यादा वाढवली आहे, ही मर्यादा आता जवळपास १५ लाख रुपये करण्यात आलेली आहे. मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदार गुंतवणूक केलेली रक्कम आवश्यक त्यावेळी काढू शकतो किंवा या योजनेचा कालावधी पाहिजे त्याप्रमाणात प्रती पाच पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.