लगेचच करा हे काम, नाहीतर तुमचे खाते होईल बंद, RBI ने जारी केले एक परिपत्रक.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना वेळोवेळी त्यांच्या असलेल्या ग्राहकांचे KYC अपडेट करण्यासाठी सांगितले आहे. म्हणून बँका त्यांच्या असलेल्या ग्राहकांना वेळोवेळी केवायसी अपडेट करण्यासाठी सांगतात. जर एखाद्या ग्राहकाने केवायसी अपडेट केलेली नाही, तर त्याचे खाते निलंबित केले जाईल. केवायसी अपडेट न केल्यामुळे, तुम्ही बँकेचे व्यवहार करू शकणार नाही. आणि तसेच, तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील पैसेही काढता येणार नाहीत.
प्रत्येक ग्राहकांसाठी केवायसी प्रक्रिया ही वेगळी असते. उदा., ज्यांच्या बँक खात्यात जास्त रक्कम असेल त्या ग्राहकांना दर दोन वर्षांनी केवायसी, ज्यांच्या बँक खात्यात कमी रक्कम असलेल्या ग्राहकांना दर 8 वर्षांनी किंवा 10 वर्षांतून एकवेळ केवायसी करावी लागेल.
केवायसी KYC बद्दल रिझर्व्ह बँकेने जारी केले परिपत्रक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( RBI ) 29 मे 2019 रोजी एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानुसार, जर एखाद्या बँक ग्राहकाने त्यांचा पॅन क्रमांक, फॉर्म 16 किंवा बँकेने सांगितलेली कोणतीही कागदपत्रे सादर केलीली नसतील तर त्यांचे खाते निलंबित केले जाईल मात्र, तसे करण्यापूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना दिली जाईल.
निलंबित झालेले बँक खाते पुन्हा चालू कसे करायचे.
केवायसी (KYC ) प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तुमचे खाते बंद केले जाऊ शकते शकते. आरबीआयच्या सांगण्यानुसार खाते पुन्हा चालू करण्याची प्रक्रिया सर्व बँकांमध्ये सारखीच आहे. तुम्ही तुमचे बंद झालेले खाते कसे चालू करू शकता ते जाणून घेऊया.
तुम्ही तुमचे खाते खली दिलेल्या तीन प्रकारे चालू करू शकता
तुमचे खाते बंद केले असेल, तर तुम्ही तुमचे खाते तीन प्रकारे चालू करू शकता. तुम्हाला या तीनपैकी
एका मार्गाने केवायसी ( KYC ) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
बँक ऑफ बडोदाच्या म्हणण्यानुसार, तुम्ही केवायसी ( KYC ) कागदपत्रांसह तुमच्या बँक खात्याच्या शाखेला भेट देऊन आणि पुन्हा केवायसी KYC फॉर्म भरुन प्रक्रिया पूर्ण करू शकता.
त्याशिवाय व्हिडिओ कॉलद्वारेही हे करता येणार आहे.
तसेच, तुम्ही पोस्टाने तुमच्या बँकेचा फॉर्म भरून तो बँकेला पाठवून केवायसी ( KYC ) प्रक्रिया पूर्ण करू शकता.
ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...