२०२३ मध्ये नव्या कापसाचे बाजारभाव पहा.

२०२३ मध्ये नव्या कापसाचे बाजारभाव पहा.



नविन कापसाला काय मिळतोय भाव, कापसाचा बाजारभाव हमीभाव पेक्षा जास्त असणार असे दिसून येत आहे.

 राज्यात यंदा कापसाने चांगलीच मुसंडी मारलेली असून कापसाचे भाव आता आठ हजार ते आठ हजाराच्या वर पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली व त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बहुतांश बाजार समितीत स्थिर आहेत.

कापसाचा नवीन हंगाम आता तोंडावर आला आहे. आपल्या कापसाचा नविन हंगाम १ ऑक्टोबर पासून सुरू होत असतो. पण याबद्दल तुम्हाला माहित आहे का, की आपल्या पेक्षा उत्तर भारतातील कापूस अगोदर बाजारात येतो. आणि सध्या पंजाब, हरियाणा व राजस्थान या तीन राज्यां मध्ये नविन कापूस विकायला येतो. आणि विशेष म्हणजे या नव्या कापसाला हमीभाव पेक्षा बाजारात जास्त भाव मिळतो. 
...

सोयाबीन पिकांवर चारकोल व कॉलर रॉटचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव ! शेतकऱ्यांना मोठा फटका;

येथे क्लिक करा/Click Here 

...

एवढंच नाही तर नविन हंगाम जोमात आला तरी कापसाचे भाव हे हमीभाव पेक्षा जास्त राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कापसाचे भाव हे हमीभाव पेक्षा जास्त राहण्यासाठी महत्वाचे तीन घटक कारणीभूत ठरणार आहेत सध्या राजस्थान, पंजाब, हरयाणा,  या तीन राज्यां मध्ये नवा कापूस बाजारात विक्रीसाठी येतो. आणि सध्या नव्या कापसाचे प्रमाण कमी आहे पण येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये या राज्यातील नविन कापसाचं प्रमाण किंवा आवक ही वाढू शकते. सध्या नव्या कापसाला या तीनही राज्यांमध्ये जवळपास सरासरी ७४०० /- ते ७७०० /- दरम्यान भाव मिळत आहे.

सरकारनं चालू हंगामासाठी म्हणजे नविन हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसासाठी  ७०२० /- हमीभाव जाहीर केला आहे. म्हणजेच सध्याच्या बाजार भावापेक्षा जास्त आहे. 

२०२३ मध्ये कापसाचे भाव कसे असणार.

बाजारावर परिणाम करणारे महत्वाचे तीन घटक कोणते असणार ते पाहुयात. त्यातला महत्त्वा चा घटक तो म्हणजे जागतिक कापूस उत्पादनात येणारी घट. 

अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजेच " यूएएन UAN" सतत मागील तीन अंदाजांमध्ये जागतिक कापूस उत्पादनामध्ये  घट येऊ शकते. अमेरिका व भारत या महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांमध्ये  यंदा कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

२०२३ च्या अहवालात म्हणजे सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेल्या अहवालात म्हणजे अंदाजे ऑगस्ट च्या तुलनेत कपात करण्यात आली आहे. जागतिक उत्पादन सहा टक्क्यांनी ६% कमी करण्यात आलं आहे. म्हणजेच गेल्या वर्षी पेक्षा जागतिक कापूस उत्पादन सहा टक्क्यांनी ६% कमी राहील, असं या अहवालात म्हटलं आहे. 

नविन हंगामात कापसाला आधार देणारा अजून एक महत्त्वा चा घटक म्हणजे दुष्काळ. यंदा देशात दुष्काळाची परिस्थिती आहे. महाराष्ट्र सह देशातील सर्वच महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आणि याचा थेट परिणाम कापूस या पिकावर होत आहे. यामुळे कापसा ची उत्पादकता कमी होऊ शकते असं सांगितलं जात आहे. त्यामुळे साहजिकच यंदा देशातील कापूस उत्पादनात घट होण्याचा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.

म्हणून वरील अहवालानुसार असे दिसून येत आहे की यंदा कापसाला हमीभावापेक्षा जास्त बाजारभाव मिळू शकतो.

ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...