सोयाबीन पिकांवर चारकोल व कॉलर रॉटचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव
विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांना अब्जावधींचा फटका; सोयाबीनचे दाणे न भरताच सोयाबीन पिवळे पडून वाळले. सोयाबीन उत्पादनात येणार घट, शेतकऱ्यांची झोप उडाली ; बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत शेतीचे दुर्देवी चित्र.
सर्वाधिक सोयाबीन या पिकाचे उत्पादन घेणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील सोयाबीनचे पीक दाणे न भरताच पिक पिवळे पड़त आहे, आणि उभे वाळत चालले आहे. यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकऱ्यांना अब्जावधी रूपयांचा फटका बसणार आहे.
.....
![]() काय आहे मिशन भगीरथ योजना. जाणून घ्या....!येथे क्लिक करा/Click Here |
बुलढाणा जिल्ह्यात हे चित्र अत्यंत भीषण असून चिखली , लोणार, मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांत यांचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसून आले आहे. देऊळगाव साकर्शा शिवारातील नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची नुकतीच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यानी शेतात जाऊन पाहणी केली.
गेल्या वर्षी सतत पडत असलेल्या पावसाने खरिपाचे हातचे पीक गेले होते. यासाठी शासनाने प्रती एकरी बाराशे १२०० /-रूपयांची मदत दिली आणि तीही बऱ्याच शेतकऱ्याना अद्याप मिळाली नाही. तर उन्हाळ्यात खूप जास्त पाऊस पड़ला, त्यामुळे रब्बी व उन्हाळी असे दोन्ही शेतकऱ्याचे हातचे पीक गेले. तीही मदत सर्व शेतकऱ्यापर्यंत अद्याप पोहोचणे बाकी आहे.
असे असताना शेतकऱ्यांची सर्व आर्थिक मदत चालू खरीप पिकांवर होती. पहिलेच तर पाऊस कमी, त्यातच विविध रोगांनी उचल खाल्याने बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागातील सोयाबीन दाणे न भरताच उभी वाळत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, बुलढाणा, या तालुक्यांत अशा नुकनासीचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
मेहकर तालुक्यातील वरवंड़ महसूल मंड़ळात देऊळगाव साकरशा या शिवारात पिवळ्या पड़लेल्या सोयाबीन पिकाची नुकतीच कृषी पर्यवेक्षक ड़ी. जी. वायाळ, कृषी सहाय्यक पी. एस. अंभोरे यांनी पाहणी केली. आणि नुकसान जास्त झालेले असून, तसा अहवाल वरिष्ठ नागरिकांना देणार असल्याचे कृषी पर्यवेक्षक वायाळ यांनी सांगितले.
असेच नुकसान बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शिवारात झाले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत शासनाने पूर्णपणे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
सोयाबीन पिकांवर चारकोल व कॉलर रॉटचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव
ज्या ठिकाणी पाऊस जास्त त्या ठिकाणी कॉलर रॉट तर पाऊस कमी असेल आणि पिकाला ताण पड़ला असेल तेथे चारकोल रॉट व मूळ खोड़ कूजत असलेले दिसून येते. अशा परिस्थितीत जमिनीचे तापमान वाढते आणि पाऊस पड़ला की कमी होते. त्यामुळे जमिनीतील बुरशीची वाढ होऊन ती खोड़ व मुळावर अटॅक करते, म्हणून यामुळे झाड़ सुरूवातीला सुकत जाते आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत अन्नद्रव्ये न मिळाल्यामुळे ते पिवळे पड़ून मर लागल्यासारखे होते. असा याचा परिणाम दिसून येतो.
ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...