यामध्ये दुष्काळी तालुक्यांमधील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये नरेगा या योजनेच्या माध्यमातून सिमेंटचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. याबाबतचा एक आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजने मधून सिमेंटचे बंधारे बांधत, यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे सर्व पाणी गावात अडविले जाणार आहे. व यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी सर्व तालुका उपअभियंता यांची बैठक घेतली आणि, त्यांना मिशन भगीरथ प्रयासबाबत सूक्ष्म आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होऊनही, धरणे असूनही, काही गावांची तहान टँकरद्वारे भागवावी लागते. फेब्रुवारी महिन्या अखेर ग्रामीण भागातून टँकरची मागणी सुरू होते. मे महिना असो किंवा पावसाळा, पाऊस लांबला की गावे आणि वाड्यांवस्त्यांतील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. जिल्हा परिषदेच्या मख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी यावर्षी टँकरमुक्तीचा संकल्प केला असून, त्यासाठी " भगीरथ प्रयास मिशन " राबविले जात आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतन जलसंधारणाची कामे करण्यासाठी 'मिशन भगीरथ' ही योजना सुरू करण्यात आली आहे.
...
...
![]() लगेचच करा हे काम, नाहीतर तुमचे खाते होईल बंद, RBI ने जारी केले एक परिपत्रक.येथे क्लिक करा/Click Here |
नाशिक जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने रोजगार हमी योजने मधून राबवलेल्या मिशन भगीरथ मधून नुकत्याच झालेल्या पावसात ४६७ सघमी (सहस्त्र घनफूट मीटर) पाणीसाठा झाला. जिल्हा परिषदेने या वर्षात रोजगार हमी योजनेतून ३६५ बंधारे मंजूर केले असून त्यातील १६३ बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांपैकी ५२ बंधाऱ्यांमध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा झाला आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या या रोजगार हमी योजनेतून ११० कोटींच्या या योजनेतून पहिल्याच वर्षी ४६७ सघमी पाणीसाठा झाला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाची सर्व कामे करण्यासाठी 'मिशन भगीरथ' ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यातून गावांची निवड करून तेथे साखळी बंधारे प्रस्तावित केले असून यासाठी लागणारा रोजगार हमी योजनेचा निधी वापरला जात आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने केलेल्या आराखड्यानुसार १५ तालुक्यांमध्ये एकूण ६०९ बंधारे प्रस्तावित केले आहेत. यापैकी आतापर्यंत जवळपास ३६५ बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी साधारणतः १६३ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे बंधारे बांधूनही ऑगस्ट महिन्या अखेरपर्यंतही त्यात साठा झालेला नव्हता.
अशी आहे ही योजना
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून अनेक लाभाच्या योजना, तसेच ९०:१० प्रमाण असलेल्या सार्वजनिक कामांच्या योजनांची संख्या वाढल्यामुळे रोजगार हमी योजनेसाठी ठरवण्यात आलेले ६०:४० चे प्रमाण राखण्यात काही अडचणी येत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेने मिशन भगीरथ ही जलसंधारणाची योजना तयार करून त्याची एप्रिल २०२३ पासून अंमलबजावणी सुरु केली. परंतू , या योजनेतील कामांसाठी ९०:१० चे कुशल- अकुशलचे योग्य प्रमाण ठरवण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील कुशल अकुशलचे ६०:४० चे प्रमाण बिघडले व यामुळे जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला रोजगार हमी योजना राबवताना कुशल अकुशल प्रमाण राखण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेने यासाठी मजुरांची संख्या अधिक असणाऱ्या योजनांचा समावेश रोजगार हमी योजनेच्या पुरवणी आराखड्यांमध्ये करून ही योजना सुरू ठेवली आहे.
रोजगार हमी योजनेतील जवळपास ३६५ बंधाऱ्याची कामे सुरु असून, १६३ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी सुरुवातीपासून पाऊस कमी पडत असल्यामुळे कामे पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठले नव्हते. मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाने निर्माण झालेल्या पाणीसाठ्यामुळे लगतच्या शेतीला सिंचनासाठी उपयोगी पडणार आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांपैकी ५२ बंधारे पूर्णपणे भरले आहेत.
ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...