Investment in SIP : २० वर्षांत तुम्ही बनू शकता कोट्याधीश, पाहा दर महिन्याला तुम्हाला SIP मध्ये किती रक्कम जमा करावी लागेल गुंतवणूक
आजच्या काळात पैसा वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गुंतवणूक. तुम्ही वेळेवर आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता.
20 वर्षांत तुम्हीही बनू शकता आता कोट्यधीश
Investment in SIP : २० वर्षांत आता बनू शकता कोट्टयाधीश, पाहा दर महिन्याला SIP मध्ये किती रक्कम जमा करावी लागेल गुंतवणूक
SIP : सध्याच्या जीवनशैलीवर नजर टाकली तर कोट्टयाधीश बनणं हे आता स्वप्नच राहिलेलं नाही तर, काळाची गरज बनलेली आहे. तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित करायचं असेल व तुमच्या सर्व गरजा कोणत्याही व्यत्ययाशिवाय / अडथळ्यांशिवाय पूर्ण करायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला आता आजपासूनच योजना तयार करावी लागेल. म्हणजेच तुम्ही येणाऱ्या पुढच्या २० वर्षानंतर कोट्यधीश बनू शकता. आता पैसा वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गुंतवणूक तुम्ही वेळेवर योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकता. आणि असे केल्यास भविष्यात तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता.
आजच्या काळात, SIP हे एक गुंतवणुकीचं साधन बनलं आहे, ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती स्वतःला सहजपणे कोट्ट्याधिष बनवू शकते. म्युच्युअल फंड मध्ये SIP एसआयपी द्वारे गुंतवणूक केली जाते. बाजारपेठेशी जोडलेले असल्यामुळे त्यात जोखीम थोडी अधिक असते व परताव्याची कोणतीही हमी नसते. परंतु तरी सुद्धा गेल्या काही वर्षांत, SIP एसआयपीनं सरासरी १२ % टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत, कोणतीही व्यक्ती दीर्घ काळासाठी गुंतवणूक करून चांगली रक्कम जमा करू शकते.
...
...
फेसबुक, इन्स्टाग्राम वापरण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे ; जाणून घ्या सविस्तर.
येथे क्लिक करा/Click Here
यासाठी किती करावी लागेल गुंतवणूक,
जर तुम्हाला येणाऱ्या २० वर्षात कोट्ट्याधीश व्हायचं असेल, तर तुम्हाला दीर्घ काळासाठी SIP एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही दरमहा जवळपास १०,००० रुपये गुंतवले तर तुम्ही २० वर्षात स्वतःला सहजपणे कोट्यधीश बनवू शकता. एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही २० वर्षे दर महिण्याला सतत १० हजार रुपये जमा केल्यास, तुमची एकूण गुंतवणूक २४,००,००० रुपये होईल. आणि यावर १२ टक्के दरानं तुम्हाला ७५,९१,४७९ रुपये रिटर्न मिळतील. यानुसार, तुम्हाला ९९,९१,४७९ रुपये म्हणजेच मॅच्युरिटीवर जवळपास १ कोटी रुपये मिळतील.
तुम्ही ही गुंतवणूक जर आणखी ५ वर्षे चालू ठेवली तर तुम्हाला SIP एसआयपीद्वारे १,८९,७६, ३५१ रुपये मिळू शकतात. एसआयपीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचं उत्पन्न वाढल्यास, तुम्ही त्यामध्ये गुंतवलेली रक्कम केंव्हाही वाढवू शकता आणि जास्तीत जास्त लाभ मिळवू शकता. याशिवाय हे कधीही बंद करता येते. तुम्ही SIP एसआयपीमध्ये जितका जास्त वेळ पैसे गुंतवता तितका चांगला नफा तुम्हाला मिळतो.
टीप - यामध्ये सर्वसामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा कोणत्याही प्रकारचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...