मोदी सरकार आता घर खरेदी करणाऱ्यांना देणार ( Subsidy ) सब्सिडी.
सरकार आता पुढील ५ वर्षांसाठी ( small urban housing ) स्मॉल अर्बन हाऊसिंगवर अनुदानित कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ६०,००० कोटी रुपये खर्च करण्याची योजना बनवत आहे.
सद्या स्थितीमध्ये आपले स्वतःचे एक घर असावे, अस प्रत्येकाच स्वप्न आहे. परंतु, शहरी भागांतील घरांच्या किंमती मध्ये जस-जशा प्रमाणत वाढत होत आहेत, तस-तसे सर्व सामान्यांचे घर खरेदीचे करण्याचे स्वप्नही दूर होत आहे. यातच आता सरकारी सूत्रांच्या अहवालाने दिलेल्या माहितीनुसार, सरकार पुढील 5 वर्षांसाठी स्मॉल अर्बन हाऊसिंगवर अनुदानित कर्ज (subsidised loans for small urban housing) उपलब्ध करून देण्यासाठी ६०,०००/- कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे.
लवकरच सुरू होऊ शकते योजना :-
बँका काही महिन्यांमध्ये ही योजना सुरू करू शकतात. या वर्षाच्या अखेरीस काही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका व २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्याचा विचार होत आहे. गेल्या महिन्यातच सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी घरगुती LPG Cylinder च्या किंमती जवळपास १८% टक्क्यांनी कमी केल्या.
.
![]() २०२३ मध्ये नव्या कापसाचे बाजारभाव पहा.येथे क्लिक करा/Click Here |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट या दिवशी आपल्या भाषाणात या योजनेसंदर्भात भाषण केले होते. परंतु या योजनेसंदर्भात माहिती समोर आली नव्हती. या योजनेत ९ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर ३ % ते ६.५% टक्के वार्षिक व्याज अनुदान दिले जाईल. दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, ५० लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्ज, २० वर्षांच्या कालावधीसह, योजनेसाठी पात्र असेल.
तुमच्या खात्यात अशा पद्धतीने जमा केले जाईल व्याज सब्सिडी ( Subsidy ) :-
एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'व्याज सब्सिडी थेट लाभार्थ्यांच्या हाऊसिंग लोन खात्यात जमा केली जाईल. २०२८ पर्यंत प्रस्तावित करण्यात असलेल्या या योजनेला अंतीम रूप दिले जात आहे. या योजनेसाठी महत्वाचे म्हणजे मंत्रीमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता असेल.' संबंधित अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, शहरी भागातील कमी उत्पन्न गटातील, कर्जासाठी अर्ज करणाऱ्या २५ लाख अर्जदारांना या योजनेचा फायदा होऊ शकतो.
ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...