पुणे येथे काळ्या जादूने 20 लाखांचे पाच कोटी करुन देण्याचा प्रकार, पुढे काय घडले?

 


पुणे येथे काळ्या जादूने 20 लाखांचे पाच कोटी करुन देण्याचा प्रकार, पुढे काय घडले?

आता प्रत्येकालाच होईल तेवढ्या लवकर जास्तीत जास्त पैसे कमवावे असे वाटत असते. या आमिषापोटी कोणतेही श्रम न करता लाखो रुपये कमवण्याचे स्पप्न पाहणारे अनेक जण असतात. मग त्यासाठी विविध प्रकारचे उपाय ते करत असतात. आणि भामटे लोक अशा लोकांच्या शोधात असतात. पुणे शहरात ( २० लाखांचे ५ कोटी ) करुन देण्याचा हा प्रकार उघडकिस आला आहे.

 पुणे शहरात काळ्या जादूने पैसे कमवण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. २० लाख रुपये द्या, आणि आम्ही त्याचे पाच कोटी रुपये करुन देतो, असा हा प्रकार आहे. २० लाख रुपये कमवण्यासाठी एका व्यक्तीने प्रयत्न सुरु केले. ५०० रुपयांच्या नोटा असलेले ४० बंडल तयार करण्यात आले. आणि नंतर काळी जादू करण्यासाठी हे ४० बंडल एका टाकीत टाकण्यात आले. त्यानंतर असे काही घडले की त्यांना त्याचा पश्चात्ताप करण्याची वेळ आली. आणि मग नंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.

...

मोदी सरकार आता घर खरेदी करणाऱ्यांना देणार ( Subsidy ) सब्सिडी.

येथे क्लिक करा/Click Here 

...

काय आहे मग हा प्रकार

पुणे शहरातील ४२ वर्षीय महिला अमृता संतोष मुशिया या पुण्यातील नारायण पेठेत राहण्यासाठी आल्या आहेत. त्यांचे व्यावसायिक भागीदार अंकितकुमार पांडे यांची तनवीर पाटील याच्या सोबत ओळख झाली होती. तनवीर हा एक जमीन खरेदी- विक्री व्यवहार करणारा व्यक्ती आहे. तनवीर पाटील याने अजून तीन जणांसोबत पांडे यांची ओळख करुन दिली. या लोकांनी राजपाल जुनेजा, तनवीर पांडे, आणि फिर्यादी महिलेला गाठले. त्यांना काळ्या जादूने २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले.

पुढे काय घडले ते पहा

नंतर महिलेची भेट ९ ऑगस्ट रोजी आनंद स्वामी नावाच्या व्यक्तीसोबत झाली. भगवे वस्त्र परिधान केलेल्या या भोंदूबाबाने २० लाखांचे ५ कोटी करण्यासाठी एक विधी करावा लागणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यासाठी त्या महिलेने पैशांची जमवाजमव केली आणि २० लाख रुपये जमा केले. १३ सप्टेंबर रोजी आरोपी त्या महिलेच्या घरी आले. त्यांनी विधी सुरु करण्यासाठी एका रिकाम्या असणाऱ्या टाकीत २० लाख रुपये टाकण्यास त्या महिलेस सांगितले. पैसे टाकीत टाकल्यानंतर आरोपींनी खोलीत खूप मोठ्या प्रमाणात धूर केला. आता पुढचा असणारा विधी हा हरिद्वार येथे जाऊन करतो, असे सांगत टाकीत टाकलेले २० लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाले.

आरोपी संपर्काबाहेर

महिलेने त्यानंतर आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यानंतर तनवीर पाटील, सुनील राठोड, शिवम गुरुजी आणि आनंद स्वामी यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर विश्रामबाग येथील पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ही घटना ९ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या दरम्यान घडली.

ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...