आजपासून लाखो मोबाईलमध्ये WhatsApp चालणार नाही; तुमचा फोन आहे का लिस्टमध्ये?

 


आजपासून लाखो मोबाईलमध्ये WhatsApp चालणार नाही; तुमचा फोन आहे का लिस्टमध्ये?

याच्यामध्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालत असणाऱ्या मोबाईलचा समावेश आहे.

जगातील ओळखल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप मध्ये WhatsApp चा समावेश होतो. भारतामध्ये देखील या App चे अब्जावधी यूजर्स आहेत. या सर्व वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आजपासून (24 ऑक्टोबर) बऱ्याच स्मार्टफोनमध्ये WhatsApp चालणार नाही. याच्यामध्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या मोबाईलचा समावेश आहे.

आजपासून WhatsApp हे केवळ अशा प्रकारच्या मोबाईलमध्ये चालणार आहे, ज्यामध्ये अँड्रॉईड ( Android - 5.0 ) किंवा त्याहून पुढची ऑपरेटिंग सिस्टीम उपलब्ध आहे. आयफोनच्या iPhone बाबतीत सांगायचं झाल्यास, केवळ iOS 12 व त्यापुढील व्हर्जनच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर WhatsApp उपलब्ध असेल जिओफोनमध्ये KaiOS 2.5.0 व त्यापुढील व्हर्जनवर WhatsApp सपोर्ट करेल. याहून जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या फोनमध्ये WhatsApp चालणार नाही.

..

दुचाकीच्या किमतीत आता खरेदी करा इलेक्ट्रिक कार Electric car

येथे क्लिक करा/Click Here 

..

अश्याप्रकरे तपासा ऑपरेटिंग सिस्टीम

तुमच्या जवळ असणाऱ्या फोनमध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, हे तपासण्यासाठी सर्वात आधी सेटिंग्समध्ये Settings जावं लागेल. यानंतर खाली स्क्रोल डाऊन करुन 'अबाउट फोन' ( About Phone) हा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर फोनमधील ऑपरेटिंग सिस्टीम व अँड्रॉईड व्हर्जन दिसेल. जर हे व्हर्जन 5.0 पेक्षा जुनं असेल, तर तुम्हाला लगेच ओएस OS version अपडेट करुन घ्यावी लागेल. 

खाली दिलेल्या मोबाईलमध्ये चालणार नाही WhatsApp 

खाली दिलेल्या काही मोबाईलमध्ये ठराविक मर्यादेपर्यंतच ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करता येते. त्यामुळे या फोनमध्ये आजपासून WhatsApp चालण्याची शक्यता आजिबातच नसणार आहे. अशा मोबाईलची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे 

ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...